" रिस्क " marathi jokes
" रिस्क " दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१|| वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो, शिवाजीमहाराज मंद हसत असतात, स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२|| मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं? ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ! मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत...