स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे घडणे पहात होते.. शाळेत एकटे असले तरीही चालते बोलते विद्यापीठ होते… पाठीवर मारताना शिवशिवणारे हात पोटभर शाबासकी देत होते.. हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना व्यवहारात निपुण करत होते.. आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते.. नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा हस्ताक्षरावर भर देत होते… शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट आर्थिक परिस्थितीला ओळखत होते.. शाळेतल्या मुलांबरोबरच शाळेचा अभिमान बाळगत होते.. परिक्षार्थी घडवण्यापेक्षा गुणी विद्यार्थी घडवत होते..
आणि हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना मनभर आनंदी होत होते…
आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते.. त्यावेळी 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते… उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते…
0 टिप्पण्या