Ad Code

Responsive Advertisement

Funniest Telephonic Conversation हॅल्लो..... !!

 Funniest Telephonic Conversation


हॅल्लो..... !!


मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...

मम्मी - हां हॅल्लो...

मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.

मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?

मुलगी - बसलाय.

मम्मी - कशाने गं ?

मुलगी - आईसक्रिम

मम्मी - मग काही घेतलस की नाही ?

मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.

मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?

मुलगी - अग, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.

मम्मी - खरच की काय ?

मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.

मम्मी - बरं, तू कशी आहेस ?

मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...

मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना ?

मुलगी - अगदी मजेत.

मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?

मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?

मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?

मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.

मम्मी - काय ग, काय झालं ?

मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.

मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?

मुलगी - अग त्याला ना...... अ‍ॅसिडीटी झालीय.

मम्मी - अ‍ॅसिडीटी ?

मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?

मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?

मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.

मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय ?

मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम

मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?

मुलगी - खरं तेच सांगतेय.

मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?

मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?

मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?

मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..

मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?

मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...

मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू...

मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.

मम्मी - तू ?

मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.

मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.

मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?

मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?

मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.

मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.

मुलगी - चल.... काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?

मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?

मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.

मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?

मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ? आंबटशौकीन कुठचा !

मम्मी - माझ्याकडे पाठव.

मुलगी - त्याला ?

मम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.

मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?

मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?

मुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या