Ad Code

Responsive Advertisement

मित्रांसाठी मराठी मध्ये मजेदार जोक्स


पुणेरी स्त्रीे ने एकदा शंकराला प्रसन्न केले….
शंकर :— मी प्रसन्न झालो आहे.. एक वरदान माग.
स्त्री :— मला तीन वरदान पाहिजेत..
शंकर :— देतो. पण एका अटिवर… तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन…
( शंकराला वाटले ती निरूत्तर होइल.. ?)
स्त्री :— चालेल मला…
वरदान १ :— मला भरपूर संप्पत्ती दे..
दिली…
सासूला दहापट मीळाली.
वरदान २ :— मला सर्वात सूंदर बनव..
बर..
सासू दहापट सुंदर..
वरदान ३ :— मला एक हलका हार्टअटॅक दे..
दिला…
सासूला दहापट अॅटक.. धड धड धड… सासू सरळ उपर..??
आता सगळं सुनेच..
शंकर त्रिशूल घेऊन त्या माणसाला शोधत आहेत
जो म्हणाला बायकांची अक्कल गुङघ्यात आहे.
नादचं खुळा

===================================

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास

वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी

डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा .
आता मला पण वेडा करनार आहेस का हरामखोर 

===================================


नशीब आमचे टिचर नव्हते बाई आणि गुरूजी होते
स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे
घडणे पहात होते..
शाळेत एकटे असले तरीही
चालते बोलते विद्यापीठ होते…
पाठीवर मारताना शिवशिवणारे हात
पोटभर शाबासकी देत होते..
हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना
व्यवहारात निपुण करत होते..
आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा
मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते.
नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा
हस्ताक्षरावर भर देत होते.
शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट
आर्थिक परिस्थितीला ओळखत होते..
शाळेतल्या मुलांबरोबरच
शाळेचा अभिमान बाळगत होते..
परिक्षार्थी घडवण्यापेक्षा
गुणी विद्यार्थी घडवत होते.
आणि
हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना
मनभर आनंदी होत होते…

आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते..
त्यावेळी 2/ 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते…
उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते.
त्याचेही श्रेय त्यांचेच होते ना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या