मराठी विनोद, (1 ते 10) मराठी विनोद, मराठी विनोद | मजेदार विनोद

 

एका ढोल्या बाईने चोर पकडला आणि ती त्याच्यावर बसली . बाईने नोकराला सांगितले . बाई : " जा आणि पोलिसाला बोलवुन आण " नोकरः माझी चप्पल सापडत नाहीये . चोर ओरडुनः अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा .


प्रेमावर कितीही विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा .... पण ' सावधान इंडिया ' चा एक एपिसोड सर्व मेहनतीवर पाणी फिरवतो .


एका क्लासची जाहिरात ... ! ' एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका ' स्त्रीयांना 50 % सवलत गण्याने विचारले ... " स्त्रियांना ५० % सवलत ? स्त्री - पुरुष समानतेच्या युगात हा भेदभाव का ? " क्लासवाले म्हणाले , " स्त्रिया आधीपासूनच फाडफाड बोलत असतात ... त्यांना फक्त इंग्रजीच शिकवायचं असतं . "


एक प्रेमळ सत्य ... मिरची आणि नवरा कितीही तिखट असले .... तरी बायको त्यांच लोणचं घालतेच ... !! काहीजणी तर ठेचा करतात हो ... !!


पश्या- जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील का रे . ? गण्या- हो .. आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील .


रविवारला लागून एखादी सार्वजनिक सुट्टी आली की बॉस आपल्याकडे अधुन मधून असा खुन्नस ने बघतो जस काय आपणच पैसे देऊन पंचाग सेट केलय ..


पावडर खाऊन केलेली बॉडी ... जमीन विकून आलेला पैसा ... आणि कॉलेजमधे पटलेली " आयटम " कधीच टिकत नाही ... !


रस्त्यावरुन एखाद्या लग्नाची वरात नाचत नाचत जात आणी ... समोरुन एका सुंदर मुलीची गाडी आली तर ... पर्व आज लगेच वरातीतील ४-५ मुलांच्या अंगात " ट्राफीक पोलीस " येतो .. !!


व्याशास्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो


बाप - बाळा , मी तुझ्यासाठी एक खुप छान मुलगी बघितली आहे ... ती रूपवतीआहे भाग्यवती आहै गुणवती आहै ज्ञानवती आहै समज सरस्वती आहै ... ! बाळ : - पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे,


बायको- ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो . तुम्ही कधी घेऊन -जाता का ? नवरा - मी4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही !!!!!


मस्त विचार करत करत चाललो होतो , अचानक एका ठिकाणी बघतो तर काय एक म्हातारं भर ऊन्हात रस्त्याच्या कडेला बसलं होत , वाईट वाटले , मन ऊदास झाले , मी त्याच्या पाशी गेलो मदत करून ऊठवायचा प्रयत्न करत असताना विचारले , म्हातरं बाबा काय झालं ???म्हाताऱ्यान हात झटकला आन म्हणाल बारा बोड्याच्या , मुतु दे की


आजबायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती ... ! आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो ... ! बायकोने कुक्कर लावले होते . १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी उठायचे नाव घेत नव्हती ... शेवटी मी म्हटल ... अगं ती डाळ जळेल ... ती फटकन् म्हणाली ... जळू देत जळली तर ... पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही .... !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Jokes In Marathi New 2020 😄 | नवीन मराठी जोक्स 2020

10 धमाल मराठी विनोदी जोक्स | Marathi Comedy Jokes for All

"हसवा आणि हसवा! धमाल मराठी जोक्स | Marathi Jokes for Fun & Laughter"